Épisodes

  • # 1581: उपरती. लेखक : अज्ञात. कथन: (सौ. मधुरा कुळकर्णी)
    Sep 24 2024

    "अती घाई संकटात नेई "
    माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतो. प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक असते. कारण एक चुकीचा निर्णय माणसाचे आयुष्य त्याच्या स्वप्नांची दिशा बदलण्यास कारणीभूत होवू शकतो.
    काही वेळेस एखादी व्यक्ती किंवा एखादा सुविचार आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने नेण्यास कारणीभूत ठरतात.
    अशीच एका राज्याच्या धुंदीत असलेल्या राजाची ही कथा..

    Afficher plus Afficher moins
    5 min
  • # 1580: राष्ट्र मजबूतीचा संकल्प. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Sep 24 2024

    मी त्याच्या उजव्या हाताला बी पी कफ बांधू लागलो. फोर आर्मवर एका जखमेचा वेडावाकडा व्रण मला दिसला.
    "इधर क्या हुआ था?"
    "गोली लगी थी साहब."
    मी उडालोच, "यह गोली का जखम है?"
    "एक नही साहब, छह लगी थी. यहाँ से यहाँ तक ब्रश फायर लगा था." त्याने आपला डाव्या हाताच्या तर्जनीने उजवा हात, उजवा खांदा, उजवी छाती आणि शेवटी डाव्या खांद्यापर्यंत निर्देश केला.
    "बाप रे, फिर बचे कैसे? आप तो सनी देओल हो."
    "काहे का सनी देओल साहब! इतना खुन बहा था की मुझे मरा समजके छोड दिया था. मेरा नसीब अच्छा था की वक्त पर डाक्टरने देखा और फस्ट एड किया. हॉस्पिटल के लिए एअर लिफ्ट मिली इसलिए वक्त पर सर्जरी हो पाई. नही तो उस दिन मै खत्म हुआ था."

    Afficher plus Afficher moins
    11 min
  • आठवण दाटतात : माढ्यच्या काकू. लेखिका:निता चंद्रकांत कुलकर्णी. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Sep 23 2024

    काकूंचा तो कट्टा म्हणजे गंमतच होती. रोज तिथं काहीतरी नवीन घडायचं .
    पलीकडची नुकतच लग्न झालेली नवीन सून घाबरतच आली. "काकु वांग्याच्या भाजीत जास्तीच मीठ झालय.काय करू?"
    " चार बटाटे उकडून तिखट,कुट घाल."
    " उद्या राहिलेल्या भाजीत ज्वारीचे पीठ, तिखट,मीठ ,कोथिंबीर घाल आणि त्याची थालपीठ कर "
    "चांगली होतील! आणि लक्षात ठेव अशा गोष्टी पुरुषांना सांगायच्या नसतात"
    ..कोणी नसेल ना तर मी आपला 'श्रीराम जय राम जय जय राम ' जप करत बसते .तो रामराया आपल्या जवळ आहे असं वाटतं बघ." अस खरखुरं अध्यात्म काकु जगत होत्या......!

    Afficher plus Afficher moins
    9 min
  • # 1577: आमच्या आजोबांचे पोहे. लेखिका गौरी ब्रम्हे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Sep 21 2024

    आमच्या आजोबांनी केलेले हे पोहे कमालीचे अपारंपारिक असतात . चक्क तूप जिऱ्याची फोडणी असते. कधी त्यात बदामाचे बारीक काप असतात, कधी मनुका असतात तर कधी फक्त ओलं खोबरं, वरून मीठ, साखर, किंचित तिखट, आणि एक दमदमीत वाफ. बस, काम तमाम! आणि तरीदेखील हे पोहे अतिशय चवदार लागतात!

    Afficher plus Afficher moins
    5 min
  • Munich Olympic - एका सुडाची कहाणी. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Sep 20 2024

    युद्धामुळे किती जीवित व वित्तहानी होईल याची कल्पना करणेच कठीण आहे. पण म्हणून काय फक्त निषेध करायचा? सूड घेण्याचे आणखीही काही मार्ग असतात.
    ५ सप्टेंबर १९७२ या दिवशी आठ खतरनाक दहशतवादी पॅलेस्टाईनी आगंतुकांनी ट्रॅक सूट घालुन म्युनिक, जर्मनीतील ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये प्रवेश केला.
    त्यांनी इस्रायलच्या ११ ओलीस खेळाडूंना गोळ्या घालून ठार केले व ते सुद्धा शार्प शूटर्सच्या गोळ्यांना बळी पडले.
    ...आणि इथून सुरू झाला एका सूडनाट्याचा थरारक प्रवास.

    Afficher plus Afficher moins
    11 min
  • # 1556: जो दुसऱ्यावरी विसंबला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Sep 17 2024

    जो दुसऱ्यावरी विसंबला| त्याचा कार्यभाग बुडाला | जो आपणचि कष्टत गेला| तोचि भला ||
    असे समर्थ रामदास स्वामी का सांगतात?
    ही छोटीशी गोष्ट ते खूप छान समजावते.
    चिमणी रोजच्याप्रमाणे आपल्या इवल्याशा चोचीतून पिलांसाठी दाणे घेऊन घरट्यात आली. पिल्लं उदास होती. चिमणीने विचारले, काय झाले, तुम्ही उदास का? पिल्लं म्हणाली, 'आई, शेतकरी आला होता, तो सांगत होता, ‘उद्या त्याची मुलं येऊन झाडाची कापणी करणार आहेत. मग आपण बेघर होऊ, याच विचाराने आम्ही उदास आहोत!' चिमणी म्हणाली, 'काळजी करू नका पिलांनो, उद्या कोणी येणार नाही. तुम्ही अगदी निश्चिन्त राहा.' दुसऱ्या दिवशी खरोखरच, कोणीच आले नाही.

    Afficher plus Afficher moins
    5 min
  • # 1576: प्रगतीपथावरचे तारतम्य. लेखिका नीलिमा जोशी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Sep 16 2024

    "online सामान घरी येते खरे, पण
    पण तुमच्या सोयीच्या वेळेनुसार येतं का?
    कधी भाजी फोडणीला टाकत असतो, कधी wash room मधे असतो, कधी पूजा करीत असतो, कधी वाचत असतो, आणि सामान येतं. दार उघडा!,"
    "OTP दिल्या शिवाय मिळत नाही
    मग फोन शोधा.
    लिस्ट प्रमाणे चेक करा.
    यात वेळ तर जातोच ना?"
    तो सुद्धा तुमच्या मनाविरुद्द,आणि गैरसोयीचा.
    मग आपल्या सोयीने, वेळ काढून का नाही बाजारातून आणायचं.?"

    Afficher plus Afficher moins
    7 min
  • # 1575: हत्तींशी बोलणारा माणूस. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Sep 16 2024

    प्रसंगानुरूप हत्तींचं वर्तन कसं असतं, हे मीच काढलेल्या छायाचित्रांचे पुन्हा पुन्हा निरीक्षण करताना माझ्या लक्षात येऊ लागलं. त्यांची एकमेकांशी संवादाची भाषा, त्यांच्या भाव-भावना, हत्तीच्या पिलांची भाषा, हे मी प्रत्यक्ष हत्तींच्या निरीक्षणातून शिकलो. माणसामध्ये जसे वेगवेगळे स्वभावधर्म आहेत, तसे हत्तींमध्येही राग, लोभ, मोह, माया, मत्सर, आनंद आणि भीती असे भाव असतात, हे लक्षात आले. मग मला त्यांच्याशी संवाद साधणं सोपं झालं.

    Afficher plus Afficher moins
    10 min